आता स्वत:च्या संरक्षणासाठी लेखक-कलावंतांनी विचारस्वातंत्र्य सेना काढावी काय?
हल्ली कुणीही उठतो आणि लेखकाला/कलावंतांना वेठीस धरतो. धमकी देतो. तोंडाला काळं फासलं जातं. मारण्याची धमकी दिली जाते. ठारही केलं जातं. नाट्यगृहात बॉम्बस्फोट घडवले जातात; पण शिक्षा कुणालाच होत नाही. उलट हे गुंड मोकाट फिरत असतात. या गुंडांच्या भीतीनं उत्तमोत्तम आविष्कार करायचं सोडून आता स्वत:च्या संरक्षणासाठी लेखक-कलावंतांनी विचारस्वातंत्र्य सेना काढावी काय, असा माझा थेट सवाल आहे.......